GENERAL INQUIRIES
www.info@mahalaxmidahanu.org
Phone : 91 9226632350
Copyright
© 2024 .Devasthan Management Committee, Western Maharastra, Dahanu. All Rights Reserved.
बखरकार फेरिस्ता यांनी हे दैवत एकेकाळी अतिशय श्रीमंत होते असे म्हटले आहे. १००८ मध्ये सुलतान महम्मदाने हल्ला करून देवस्थान लुटले होते. त्या वेळी त्याने सात लाख सुवर्ण दिनार, सातशे मणांचे सोन्या-चांदीचे पत्रे , दोनशे मण शुद्ध सोन्याच्या लगडी , दोन हजार मण अशुद्ध चांदीचे पट, वीस मण रत्ने, हिरे, मोती, पाचू, माणिक असा किमती ऐवजी लुटून नेला होता. तर गझनीच्या महम्मदाने हे देऊळ लुटून तिथे मशीद बांधली. मुस्लिम राज्य खालसा झाल्यानंतर, इथे पुन्हा मंदिर बांधले गेले. त्या वेळी राजा तोरडमल यांच्यासोबत अकबर बादशहाने देवीचे दर्शन घेतले होते. पंजाब प्रांत स्वतंत्र केल्यानंतर राजा रणजितसिंहाने मंदिरावर सोन्याचा कळस चढवला अशा ऐतिहासिक नोंदी नोंदवण्यात आल्या आहेत.
डहाणू हे पालघर जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्य ठिकाण असून पश्चिम रेल्वेच्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर आहे. ते मुंबईपासून सव्वाशे किलोमीटर अंतरावर आहे. ते महत्त्वाचे वनसंपत्ती केंद्र आहे. तेथील छोट्या बंदरातून लाकडांचा व्यापार चालतो. निसर्गसौंदर्यांने नटलेल्या या शहराजवळ, अठरा मैलांवर विवळवेढे नावाचे गाव आहे. त्या गावी महालक्ष्मीचे स्थान असून ते जागृत मानले जाते. देवीला या भागात ‘आई’ म्हणून ओळखण्यात येते
|
|


Alankar pooja
